'मेरे पास माँ है' हा अजरामर डायलॉग शशी कपूर यांना दिवार चित्रपटामध्ये मिळाला आणि त्यांची भूमिका कायमचीच लक्षात राहिली. पण हा डायलॉग शशी कपूरसाठी लिहिलाच नव्हता. मग तो त्यांना कसा मिळाला ?सुरुवातीला या सिनेमासाठी अमिताभऐवजी शत्रुघ्न सिन्हा होते. तर शशी कपूरच्या ठिकाणी नवीन निश्चल. पण शत्रुघ्न सिन्हांनी सिनेमातून माघार घेतली. त्यांच्या जागी अमिताभ बच्चननी ती भूमिका साईन केली.अमिताभ आणि नवीन निश्चल यांचा याआधीचा सिनेमा काही चालला नव्हता म्हणून नवीन निश्चल यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय चोप्रांनी घेतला आणि त्या जागी शशी कपूर आले.शशी कपूर यांचा मेरे पास माँ है हा डायलॉग ऐतिहासिक ठरला. आजही शशी कपूरना आदरांजली वाहताना सर्वांना आठवतो तोच डायलॉग.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews